जलशक्ती मंत्रालय अधिनस्थ केंद्रीय भूजल विभागात, वरिष्ठ भूजलवैज्ञानिक म्हणून कार्यरत असणारे परंतु महाराष्ट्रात मात्र “जलसाक्षरता प्रसारासाठी झटणारे सहज जलबोधकार” म्हणूनच जास्त परिचीत/प्रसिद्ध असणारे, श्री. उपेंद्रदादा धोंडे यांनी आज आनंदवन प्रकल्पांना भेट दिली.
पुणे शहराच्या दक्षिण -पूर्व भागात गेल्या 10-11 वर्षांपासून आनंदवन प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड सुरू आहे. पुणे शहरातील स्वयंस्फूर्त पर्यावरण प्रेमींचे हजारो हात दरवर्षी या भागात वृक्षारोपण आणि वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपनासाठी झटत आहेत. उपेंद्रदादा धोंडे यांना या ठिकाणचे काम पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते, त्यानूसार आज आनंदवन कार्यकर्त्यांसह सर्व ठिकाणी स्थळभेटी झाल्या. आनंदवन -१ ते आनंदवन -५ या सर्व यापूर्वी झालेले वृक्षारोपण आणि जल संधारण प्रयोगांची पाहणी या निमित्ताने करण्यात आली. उपेंद्रदादांनी वृक्षलागवड उपक्रमात जलसंधारणाची जोड या विषयावर अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी जल आराखडा, भैरव कुंड आणि तलाव निर्माण या मुद्द्यांवर चर्चा झाली.
वर्तमान आनंदवन-४ आणि भावी आनंदवन -५ या प्रकल्पांसाठीच्या जल आराखडा निर्माणासाठी सर्वैतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपेंद्रदादांनी यावेळी आनंदवन टिमला दिले. तसेच पंचस्तरीय वृक्षलागवड आणि जल संधारणाचा एकत्रित परिणाम म्हणजेच निसर्गबेट, हि शास्त्रोक्त पद्धती/संकल्पना राज्यभरातील सर्व पर्यावरण प्रेमी, वृक्ष प्रेमींनी आत्मसात करावी असे आवाहन देखील त्यांनी केले.
आनंदवन टिमतर्फे देखील लवकरच सर्व कार्यकर्त्यांसाठी सहज जलबोध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन आणि आनंदवन प्रकल्पातील जल संधारण प्रयोगाचे सादरीकरण या विषयांवर जाहीर कार्यक्रमाचा मानस प्रकट केला गेला आणि जर भुजल वैज्ञानिक – विषयतज्ञ व पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते यांचे संयुक्त प्रयत्न महाराष्ट्राला निसर्ग समृद्ध करतील अशी आशा, असा विश्वास व्यक्त केला गेला.